Festival Posters

पाकिस्तानी गोळीबारात 8 नागरिक जखमी

Webdunia
गुरूवार, 19 ऑक्टोबर 2017 (09:51 IST)
जम्मू -पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाचे सत्र कायम ठेवत आज जम्मू-काश्‍मीरच्या पूँच आणि राजौरी जिल्ह्यांत मारा केला. त्यात आठ नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये दोन वर्षीय बालिकेचाही समावेश आहे.
 
पाकिस्तानी सैनिकांनी आगळीक करत नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या भारतीय सीमा नाक्‍यांबरोबरच नागरी भागांना लक्ष्य केले. त्यांनी गोळीबाराबरोबरच तोफगोळ्यांचा मारा केला. त्यामध्ये पूँच जिल्ह्यात पाच जण तर राजौरी जिल्ह्यात तीन जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पाकिस्तानी माऱ्यात तीन वाहनांचेही नुकसान झाले.
 
पाकिस्तानच्या चिथावणीखोर माऱ्याला भारतीय सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 2003 या वर्षात शस्त्रसंधी करार झाला. या कराराचा भंग करण्याचे सत्रच पाकिस्तानी सैनिकांनी चालू वर्षात आरंभले आहे. त्यांनी यावर्षात आतापर्यंत सहाशेहून अधिक वेळा शस्त्रसंधी भंगाची आगळीक केली आहे. पाकिस्तानी माऱ्याला जबरदस्त प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्यात मोठी हानी होत असूनही पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कुरापती थांबलेल्या नाहीत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

पुढील लेख
Show comments