Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरेगाव भीमा हिंसाचार, आणखी ४ आरोपींची छायाचित्रे जारी

Webdunia
शुक्रवार, 8 जून 2018 (16:06 IST)

राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने   कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी आता आणखी चार आरोपींची छायाचित्रं जारी केली. कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रं आणि चल चित्र जारी केली. या तीनही आरोपींबद्दल माहिती देण्याचं आवाहन सीआयडीने केलं आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघांनीही राहुलची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता.पोलिसांनी  केलेल्या कारवाईनंतर एकूण आठ जणांना अटक केली होती. त्यात राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी तिघांना तर उर्वरित पाच जणांना सणसवाडीतल्या हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आली होती.

 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments