केदारनाथमधील प्रसिद्ध देवस्थान केदारनाथ मंदिराचे द्वार २९ एप्रिल रोजी भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊनचा कालावधी असताना मंदिर प्रवेशाबाबतही काही निकष घालून दिले आहेत.
मंदिराचे द्वार उघडल्यावर यात केवळ मुख्य पुजाऱ्यांसह १६ जणांच्याच उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. शिवाय सध्याची परिस्थिती बघता भाविकांना अजूनही मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी प्रशासनाने दिलेली नाही. याबाबतची माहिती रुद्रप्रयागचे डीएम मंगेश घिल्डियाल यांनी दिली आहे. मात्र भाविकांनी यावर नाराजी दर्शवत प्रशासनाच्या या नियमांचा विरोध दर्शवला आहे.