Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा कट उधळला

Webdunia
गुरूवार, 28 मे 2020 (16:54 IST)
काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे पुलवामासारख्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेला आहे. दक्षिण काश्मीरच्या राजापोरा परिसरात गुरुवारी एका IED (improvised explosive device) स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली. यानंतर बॉम्बशोधक पथकाने तातडीने घटनास्थळी येत ही स्फोटके निकामी केली. प्राथमिक माहितीनुसार, ४४ राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि पुलवामा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ही स्फोटके जप्त करण्यात आली. चार ते पाच दिवसांपूर्वी सुरक्षादलांना एका कारमधून स्फोटके आणण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

यानंतर सुरक्षा दलांकडून या कारचा कसून शोध घेतला जात होता. अखेर आज सकाळ राजापोरातील एका परिसरात ही कार आढळून आली. यानंतर तात्काळ बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे दहशदवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला गेल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली. भारतीय जवान याठिकाणी पोहोचले तेव्हा दहशतवादी कारमध्ये होते. मात्र जवानांना बघून त्यांनी पळ काढला.

संबंधित माहिती

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

पुढील लेख
Show comments