Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भिंत कोसळून अपघातात अनेकांचा मृत्यू

Webdunia
रविवार, 21 एप्रिल 2024 (12:58 IST)
हरियाणाच्या गुडगावमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी गुडगावमधील मदनपुरी स्मशानभूमीची भिंत अचानक कोसळली. ही भिंत कोसळली तेव्हा तेथे लहान मुले आणि काही लोकही उपस्थित होते. भिंत कोसळल्याने अर्धा डझनहून अधिक लोक गाडले गेले. ज्यामध्ये 2 मुलांसह 3 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला . उर्वरितांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांसह घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य सुरू केले. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 
 
या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आला असून, त्यात काही लोक भिंतीलगत रस्त्यावर खुर्च्यांवर बसले होते आणि अचानक भिंत कोसळली आणि ते खाली गाडले गेले. भिंत कोसळल्याचे बघून त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण ते गाडले गेले. 

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कोसळलेल्या मदनपुरी स्मशानभूमीच्या भिंतीसमोर हजारो टन लाकूड ठेवण्यात आले होते. या लाकडांच्या वजनामुळे ही भिंत वाकडी झाली होती, त्यासाठी लोकांनी स्मशानभूमी प्रशासनाला अनेक वेळा दुरुस्तीची मागणी केली होती, पण काहीही ऐकू आले नाही. शनिवारी सायंकाळी 6.20 वाजेच्या सुमारास येथे काही लोक बसले असताना अचानक भिंत कोसळल्याने हे लोक त्याखाली गाडले गेले. दरम्यान, तेथून जात असलेली सात वर्षांची तान्या आणि दहा वर्षांची खुशबू या दोघीही जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
Edited By- Priya Dixit    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments