Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Meerut:बंद फाटकाखालून गाडी नेताना पतीच्या डोळ्या देखत पत्नी- मुलींचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (11:25 IST)
रेल्वेचे फाटक बंद असताना देखील काही लोक आपल्या जीवाची पर्वा न करता बंद फाटकाच्या खालून निघून रेल्वेचे रूळ ओलांडतात. पण अनेकदा ट्रेनची धडक बसून लोक मृत्युमुखी होतात. असेच काहीसे घडले आहे मेरठच्या कंकरखेडा  परिसरातील कासमपूर फाटकावर रविवारी संध्याकाळी आनंद विहारहून डेहराडूनकडे जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला रिक्षा धडकली. रिक्षात प्रवास करणारी महिला आणि तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. नवरा थोडक्यात बचावला.

कॅन्टोन्मेंटच्या राजबन येथील रहिवासी नरेश, त्याची पत्नी 40 वर्षीय मोना आणि दोन मुली, 14 वर्षीय इशिका  आणि सात वर्षीय चारू हे बहिण लक्ष्मीला भेटण्यासाठी रेहडा येथून कंकरखेडा येथील अशोकपुरी येथे जात होते. . नरेश हा रिक्षा गाडी चालवत होता आणि मागे त्याची पत्नी व दोन मुली बसल्या होत्या. कासमपूर रेवाळे गेट बंद असताना त्यांनी खालूनरिक्षा  बाहेर काढण्यास सुरुवात केली. तेवढ्यात वंदे भारत ट्रेन आली.
 
रिक्षाचा मागचा भाग ट्रेनला धडकला. त्यामुळे ट्रेनची धडक बसून लक्ष्मी आणि तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. लोको पायलटने एक किमी अंतरावर असलेल्या कॅन्ट स्टेशनवर ट्रेन थांबवली.त्यांनतर गाडी डेहराडूनला पाठवण्यात आली.पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नागरिकांच्या मदतीने शव रुळावरून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. 
 
 



Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments