Dharma Sangrah

खासदार नवनीत राणांचे वडील फरार घोषित!

Webdunia
सोमवार, 30 जानेवारी 2023 (21:30 IST)
खासदार नवनीत राणा यांना कोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर यांना शिवडी कोर्टाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच राणा आणि त्यांच्या वडिलांना १ हजार रुपयांचा दंड देखील केला आहे. जात पडताळणी प्रकरण नवनीत राणा यांना चांगलेच भोवताना दिसत आहे.
 
काय आहे प्रकरण?
नवनवीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवनीत राणा यांचे वडिल हरभजन सिंग कौर यांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आता कोर्टाचा दणका
नवनीत राणा आणि त्यांच्या वडील हरभजन सिंग कौर यांच्या विरोधात मुंबईतील शिवडी येथील कोर्टात खटला सुरू आहे. आज या प्रकरणाची सुनावणी होती. आज सुनावणी वेळी नवनीत राणा यांचे वकील कोर्टात उपस्थित नव्हते.
 
शिवडीच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी सुरू होताच नवनीत राणा यांच्या वडिलांच्या नावाचा पुकारा करण्यात आला. पुकारा होऊन सुद्धा नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस हे कोर्टात हजर न झाल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आले.
 
यापूर्वी हरभजनसिंह यांच्याविरोधात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. मात्र, त्यांनी कोर्टात हजेरी लावली नाही. त्यामुळे आता कोर्टाने त्यांना फरार घोषित केले असून आता हरभजनसिंह यांच्या निवासस्थानी कोर्टाची नोटीस लावण्यात येईल.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments