Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील नक्षली कॅम्प उद्ध्वस्त

Webdunia
मंगळवार, 2 एप्रिल 2024 (09:30 IST)
देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच, ऐन निवडणुकांपूर्वी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांच्या तळावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात अनेक स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात इतर वस्तू जप्त करण्यात पोलिसांना यश आले. गडचिरोली पोलिसांनी वेगवान कारवाई करत गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्प शुक्रवार (ता. २९) उद्ध्वस्त केला.
 
कसनसूर-चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड- महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पोलिस स्टेशन पेंढरीपासून १२ किमी पूर्वेला) तळ ठोकून असल्याची विश्वासार्ह माहिती शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांना मिळाली.
 
या माहितीच्या आधारे अपर पोलिस अधीक्षक (अभियान ) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाच्या जवानांद्वारे जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले.
 
अभियान पथक शनिवारी सकाळी ४५० मीटर उंच टेकडीवर पोहोचले. त्यावेळी माओवादी नुकतेच या ठिकाणहून निघाले होते. डोंगरमाथ्यावरील ठिकाणावर शोधमोहीम राबविली असता त्याठिकाणी माओवाद्यांचे एक मोठे आश्रयस्थान आणि छावणी सापडली. तो कॅम्प अभियान पथकाद्वारे नष्ट करण्यात आला. जंगल परिसरात पुढील शोध सुरू करण्यात आला. परंतु अत्यंत खडतर प्रदेश आणि पर्वतांचा फायदा घेत माओवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
 
यावेळी घटनास्थळावरून कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन स्टिक्स, बॅटरी, वॉकीटॉकी चार्जर, बॅकपॅक आदींसह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. विशेष अभियान पथकाची सर्व पथके रविवार (ता. ३१) गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहे. छत्तीसगड सीमेवर माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.
Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments