rashifal-2026

गडकरीनी राज यांना अहवाल पाठवून दिले उत्तर

Webdunia
शनिवार, 24 मार्च 2018 (08:43 IST)
आतापर्यंत मी ज्या ज्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या, त्याची कागदपत्र सभेच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंना पाठवण्याल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. याबाबतचा 25 पानी सविस्तर अहवाल गडकरींनी राज ठाकरेंना पाठवला.   यामध्ये महाराष्ट्रात आतापर्यंत कुठं कुठं किती किलोमीटरचे रस्ते तयार केले, त्यासाठी किती निधी मंजूर झाला,  किती दिवसात रस्ता तयार झाला, याची सगळी माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात रस्त्याच्या कामांसाठी 2 लाख 82 हजार कोटी, बंदरविकासासाठी 70 हजार कोटी तसंच सिंचन प्रकल्पांसाठी 75 हजार कोटी रुपये मंजूर झाल्याचं, गडकरींनी राज ठाकरेंना पाठवलेल्या अहवालात म्हटलं आहे. 
 
मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरेंनी नितीन गडकरींची खिल्ली उडवली होती. शिवाय गडकरी फक्त घोषणा करतात, कामं करत नाही, असा आरोप केला होता. त्याला आता गडकरींनी लेखी उत्तर पाठवलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments