Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता कोर्ट ठरवणार बटर चिकन आणि दाल मखनीचे खरे निर्माते

Webdunia
सोमवार, 22 जानेवारी 2024 (15:45 IST)
बटर चिकन आणि दाल मखनी या उत्तर भारत, पंजाब आणि दिल्ली भागात अतिशय लोकप्रिय आहे.
भारतीय लोकांची संख्या विपुल प्रमाणात असलेल्या इतर देशांमध्येही हे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मात्र हे पदार्थ कोणी शोधले हा वाद आता उफाळून आला आहे. इतकंच नाही तर हा वाद आता कोर्टात गेला आहे.
 
मोती महल विरुद्ध दर्यागंज
ANI या वृत्तसंस्थेनुसार दिल्लीतील प्रसिद्ध मोती महल रेस्टॉरंटने दर्यागंज रेस्टॉरंटविरुद्ध केस दाखल केली आहे. मोती महलने आरोप केला आहे की जो पदार्थ त्यांनी शोधला आहे तो दर्यागंजने शोधला आहे असा दावा ते करत आहेत. मोती महल रेस्टॉरंटने दावा केला आहे की, त्यांचे पूर्वज हलवाई कुंदन लाल गुजराल यांनी दाल मखनीचा शोध लावला आहे. मोती महल आम्हीच बटर चिकन आणि दाल मखनीचा शोध लावला अशी टॅगलाईन वापरत आहेत. त्यांच्या मते ही त्यांच्या ब्रँडची ओळख आहे. अशा परिस्थितीत मोती महलच्या मालकांनी आरोप केला आहे की दर्यागंजने आमच्या व्यवसायाचं नुकसान केलं आहे आणि मोती महलच्या प्रतिष्ठेला तडा गेला आहे.
 
या प्रकरणाची 16 जानेवारीला दिल्ली उच्च न्यायालयाचे जस्टिस संजीव नरुला यांच्यासमोर सुनावणी झाली. कोर्टाने दर्यागंज हॉटेलच्या चालकांना समन्स पाठवला आणि एका महिन्याच्या आत उत्तर देण्यास सांगितलं आहे. मोती महलचे वकील संदीप सेठी यांनी युक्तिवाद केला की दर्यागंज आणि मोतीमहल एकमेकांशी निगडीत आहेत. म्हणजे एकमेकांच्या नात्यात आहेत. त्यांनी दावा केला की बचाव पक्ष दर्यागंज रेस्टॉरंट लोकांची दिशाभूल करत आहेत की दर्यागंज रेस्टॉरंट आणि मोती महलचे संचालक एकमेकांच्या नात्यात आहेत. मोती महल कुंदन लाल जग्गी यांनी सुरू केलं आहे.
 
संदीप सेठी यांनी पुढे आरोप केला की दर्यागंज रेस्टॉरंट यांनी आरोप केला की मोती महलचे मालक कुंदन लाल गुजराल यांचा फोटो फेसबुकवर वापरल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की दर्यागंजचे लोक सांगत सुटले आहेत की कुंदन लाल जग्गी हे त्यांचे वडील आहेत. वकिलांनी असाही दावा केला आहे की पेशावर येथील मोती महल रेस्टॉरंटचा फोटो बचावपक्षाने त्यांच्या वेबसाईटवर लावला आहे. संजीव नरुला यांच्या खंडपीठाने बचावपक्षाला आणि प्रतिवाद्यांना समन्स पाठवला आहे. स रजिस्ट्रारच्या उपस्थितीत सुनावणीसाठी हा समन्स पाठवला आहे. या प्रकरणाची सुनावणी 18 मार्चला होणार आहे.

बचावपक्षाचं काय म्हणणं आहे?
बचावपक्षाचे वकील अमित सिब्बल म्हणाले की हा खटला अत्यंत तथ्यहीन आणि चुकीचा आहे. सिब्बल म्हणाले की आम्ही कोणताही घोळ घातलेला नाही. सिब्बल यांनी स्पष्ट केलं की मोती महलच्या फेसबुक पेजवर जो फोटो टाकला आहे त्याचा आमच्याशी काही संबंध नाही. तो फोटो A to Z किचनचा आहे.
पेशावरच्या मोती महल रेस्टॉरंटबद्दल सिब्बल म्हणाले की रेस्टॉरंट दोन्ही पक्षांच्या पूर्वजांनी सुरू केलं होतं. त्यामुळे त्यांचाच या फोटोवर अधिकार नाही. ते म्हणाले की दर्यागंजचे लोक हा फोटो वापरू शकतात.
ते म्हणाले की वेबसाईटवरचा फोटो अशा पद्धतीने क्रॉप केला आहे की मोती महल त्यात दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य नाही. बटर चिकन तयार करण्यासाठी चिकन मॅरिनेट करतात. त्यात दही, आलं, लसूण, आणि इतर मसाले घालतात. नंतर चिकनचे तुकडे टोमॅटो पेस्टमध्ये शिजवतात. त्यानंतर त्यात बटर घालतात. ते साधारणत: पोळी, नान किंवा भाताबरोबर खाल्ला जातं. दाल मखनी तयार करण्यासाठी उडदाची डाळ आणि राजमा पाण्यात उकळवतात. त्यानंतर दहा मिनिटांनी ती विविध मसाले घालवून शिजवली जाते. त्यातही बटर घातलं जातं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चतुर्थीला चंद्र दिसला नाही तर या 3 प्रकारे व्रत सोडा ! धार्मिक नियम जाणून घ्या

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वंध्यत्व आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो !

साखरेपेक्षा गुळ चांगला का आहे? त्याचे 5 सर्वोत्तम फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

पुढील लेख
Show comments