Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विद्यार्थ्यांच्या भोजनात पाल, 100 हून अधिक आजारी मुलांना रुग्णालयात दाखल केले

Webdunia
गुरूवार, 28 सप्टेंबर 2023 (12:30 IST)
झारखंड येथील पाकुड जिल्ह्यातील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांच्या भोजनात पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. आहार घेतल्याने 100 हून अधिक विद्यार्थी आजारी पडल्याचे सांगितले जात आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
प्राप्त माहितीप्रमाणे पाकुडिया प्रखंड स्थित एका प्रायव्हेट शाळेच्या जेवणात पाल पडली होती. ते विषारी जेवण सेवन केल्यानंतर मुलांना उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास सुरु झाला. या आहारामुळे 100 हून अधिक विद्यार्थी आजारी पडल्याचे सांगितले जात आहे.
 
यानंतर लगेच 60 हून अधिक विद्यर्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले गेल तर 40 हून अधिक विद्यार्थ्यांना स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. आता सर्व मुलं धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.
 
हे प्रकरण पाकुडिया प्रखंड क्षेत्रात झरिया गावाचे आहे जिथे रात्री वसतिगृहातील मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणात पाल आढळून आल्याचे सांगितले जात आहे. या चुकीमागील कारणाचा शोध घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हा शिक्षा अधिकार्‍यांनी सांगितले.
photo: symbolic

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments