Festival Posters

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

Webdunia
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. येथे मुलीच्या कुटुंबातील लोकांनी दुसर्‍या जातीच्या मुलाशी प्रेम प्रसंग असल्याचे माहीत पडल्यावर दोघांचा जीव घेतला. या गुन्ह्यात मुलीचे वडील, काका आणि मामाचा मुलगा सामील होते. पोलिसांनी तिघांना अटक करून चौकशी सुरू केली आहे.
 
माहितीप्रमाणे मुलीच्या घरच्यांनी प्रियकर व प्रेयसीची हत्या करून त्यांच्या मृत देहाचे तुकडे करून पेट्रोल टाकून जाळले. हे प्रकरण वजीरगंज येथील आहे. घटना पैमार नदीजवळ घडली असून अवशेष जप्त करण्यात आले आहे.
 
तरुण मनियारा येथे मुलीला ट्यूशन देत होता. या दरम्यान दोघे प्रेमात पडले. नंतर त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केले आणि वजीरगंज येथे भाड्याच्या घरात राहत होते. मुलीच्या घरच्यांना हे प्रकरण कळल्यावर त्यांना पोलिसांवर दबाव टाकून दोघांना अटक केली नंतर तरुणाला जेल पाठवले होते. जेलहून बाहेर आल्यावर तरुण आपल्या बहिणीकडे राहत होता. नंतर 7 फेब्रुवारीला बहिणीच्या घरून परत येत असताना आपल्या प्रेयसीला भेटायला मनियारा पुलाजवळ पोहचला होता. तो जवळच पेट्रोल पंपावर गेला असताना तेथून त्याचे अपहरण केले गेले. नंतर हुबली नदी किनार्‍यावर सुनसान जागी मुलीला घेऊन आल्यावर दोघांचा गळा घोटून खून केलं. नंतर मृत देहाचे तुकडे करून जाळले. तिघांना आपला गुन्हा स्वीकाराला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments