पाकिस्तानच्या 3 लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची बातमी आहे. जम्मू- काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानांनी घुसखोरी करत बॉम्ब फेकल्याचे वृत्त आहे. या विमानांनी नौशेरा सेक्टरमध्ये बॉम्बहल्ला केल्याचे समजते. या घटनेत कुठल्याही प्रकाराचे नुकसान झालेले नाही.
हवाई दलाच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी पाकिस्तानमधील एअर स्ट्राइक केले होते आणि यात 350 दहशतवादी मारले गेले. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान हादरला.
बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर देताच तिन्ही विमाने माघारी परतली.