Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीएम मोदींनी दिले सर्वात कमी वेळेचे भाषण...

Webdunia
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017 (23:26 IST)
स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान यांनी नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. परंतु, त्यांचे भाषण नेहमीच जास्तवेळ चालते हे सर्वांनाच माहिती आहे. यंदा मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण केले ते सर्वात कमी वेळेचे असल्याचे बोलले जात आहे.  यावेळी त्यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचे हे भाषण ५४ मिनीटांचेच होते.
 
स्वातंत्र्य दिनाचे भाषण खूप मोठं असतं, अशी तक्रार करणारी पत्रे देशभरातून पंतप्रधान कार्यालयात आली होती. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी सर्वात छोटे भाषण करणार असल्याचे त्यांनी  मागच्या वेळी ‘मन की बात’मध्ये सांगितले होते.  गेल्या चार वर्षाच स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या झालेल्या भाषणांमध्ये हे भाषण कमी वेळाचे ठरले आहे. यामागचे कारण पंतप्रधान मोदी यांनी याआधीच स्पष्ट केले होते. पंतप्रधान झाल्यावर २०१४ मध्ये मोदींनी लाल किल्ल्यावरून पहिले भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी देशातील जनतेशी ६५ मिनिटे संवाद साधला होता. २०१५ मध्ये ८६ मिनिटे आणि २०१६ मध्ये ते ९४ मिनिटे त्यांनी जनतेशी संवाद साधला होता. या महत्त्वपूर्ण भाषणांमध्ये त्यांनी विविध मुंद्दयांना हात घातला होता. गेल्या तीन वर्षांपासून मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. त्यांनी आज पंतप्रधान म्हणून चौथे भाषण केले.
 
सकाळी ७.३० वाजता लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यावर सुरु झालेले भाषण ८.३० वाजता संपले. या भाषणात त्यांनी महिला सबलीकरण, गोरखपूरमधील बालमृत्यूची घटना, ‘न्यू इंडिया’ अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी ते केवळ ५४ मिनीटेच बोलले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments