Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
, शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (09:07 IST)
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने  कार्यक्रमाची तयार जोरात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी 11 वाजून 15 मिनिटांनी अयोध्येत पोहोचतील. ते दोन तासांहून अधिक वेळ तेथे राहणार आहेत. यानंतर ते दुपारी 2 वाजता अयोध्येतून परततील.
 
अयोध्येत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी सर्वप्रथम हनुमानगढी येथे जाऊन तेथे दर्शन घेतील. यानंतर ते रामललाचे दर्शन करतील आणि यानंतर भूमिपूजनचा कार्यक्रम होईल. या व्यासपीठावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हेच उपस्थित राहतील. भूमिपूजन कार्यक्रमसाठी 200 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण