Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रक्षाबंधनापूर्वी किडनी देऊन बहिणीने भावाचा जीव वाचवला

Webdunia
मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (16:21 IST)
रक्षाबंधन हे भाऊ बहिणींचा सण आहे. बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आयुष्यभर  बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो . पण रक्षाबंधनाच्या पूर्वी एका बहिणीने डायलियसीस घेणाऱ्या भावाची किडनी निकामी झाल्यामुळे त्याला किडनी दान करून भावाचे प्राण वाचवले.हरेंद्र डिसेंबर 2022 पासून डायलिसिसवर होते.
 
अचानक थकवा येणे, विनाकारण थकवा येणे, भूक न लागणे अशी लक्षणे त्याच्यात होती. डिसेंबर 2022 पर्यंत, नियमित डायलिसिस हा हरेंद्रचा दैनंदिन दिनक्रम बनला होता. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. 
 
दरम्यान, धाकटी बहीण प्रियांका (वय 23) हिने तिची एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. लोकांनी प्रियांकाला समजावून सांगितले की, यामुळे तिला नंतर आई होण्यात अडचणी येऊ शकतात, पण तरीही ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. किडनी प्रत्यारोपण 10 ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात झाले.या प्रकरणात, डॉक्टरांचे म्हणणे आहे की किडनी दान केल्याने स्त्रीच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होत नाही.
 
 नवीन जीवन मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना हरेंद्र म्हणतो की, त्याची बहीण एक शक्ती म्हणून त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि या रक्षाबंधनाला त्याला एक अनमोल भेट दिली.




Edited by - Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments