स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता 100% नव्हे तर तब्बल 400% वाढलीय. असा अहवाल आयआयटी मुंबईतील तज्ज्ञांनी दिलाय. स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका 400 टक्क्यांनी वाढल्याचं स्पष्ट झालंय. मुंबई आयआयटीचे इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी याबाबत अहवाल केंद्र सरकारला दिलाय... तरूणांना याचा सर्वाधिक धोका असल्याचंही यात म्हटलंय.
स्मार्ट फोनचा अतिरिक्त वापर दुर्लक्षित करू नका. त्यामुळे मेंदूचा कर्करोग होण्याच्या शक्यतेत 400 टक्क्यांनी वाढ झालीये. स्मार्ट फोनमधून बाहेर पडणाऱ्या फ्री रे़डीकल्समुळे मानवी शरीरावर मोठा परिणाम होतो. विशेषतः पुरूषांच्या जननक्षमतेवर त्याचा विपरित परिणाम होतो. दिवसाला अर्ध्या तासाहून अधिक काळ स्मार्ट फोन वापरल्यास ते धोकादायक ठरू शकतं.