Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शालेय विद्यार्थी चालत्या बसमध्ये दारू पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशी सुरू

Webdunia
गुरूवार, 24 मार्च 2022 (19:33 IST)
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही शाळकरी मुले चालत्या बसमध्ये दारू पिताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली होती. हा व्हिडिओ तामिळनाडूचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये शाळेतील मुले-मुली दोघेही दिसत असल्याचे दिसत असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
 
वास्तविक, ही घटना तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील आहे. एका वृत्तात सांगितले की, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सत्य समोर आले, ज्यामध्ये ही घटना मंगळवारी घडल्याचे सांगण्यात आले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शाळेच्या गणवेशात काही विद्यार्थी तिरुकाझुकुंद्रमहून थचूरला जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. यावेळी काही विद्यार्थ्यांनी मद्य प्राशन केले.
 
 
हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांना धक्का बसला. अहवालानुसार, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments