एकाच दिवसात तीनवेळा पुढे ढकलल्यानंतर अखेर इस्रोच्या गगनयानचं TVD1 हे चाचणी उड्डाण अखेर यशस्वी झालं आहे.TVD1 मध्ये गगनयानच्या क्रू एस्केप मोड्यूल यंत्रणेची चाचणी करण्यात आली.
प्रत्यक्ष मोहिमेदरम्यान अंतराळवीर या क्रू मोड्यूलमधूमच प्रवास करणार आहेत. एखादी आपात्कालीन स्थिती निर्माण झाल्यास हे मोड्यूल रॉकेटपासून विलग करून समुद्रात अलगद उतरवलं जाणार आहे, त्याचीच आज (21 ॲाक्टोबर रोजी) चाचणी घेण्यात आली.
सकाळी आठ वाजता होणारी ही चाचणी तीनदा पुढे ढकलण्यात आली. 8:45 वाजता तर उड्डाणाला पाच सेकंद बाकी असतानाच चाचणी थांबवावी लागली.
अखेर 10 वाजता रॅाकेट अवकाशात झेपावलं. 60 सेकंदांनी रॅाकेटपासून क्रू एस्केप सिस्टिम विलग झाली. 90 सेकंदांनी क्रू मॅाडेल एस्केप सिस्टिमपासून वेगळं झालं आणि पुढे पॅराशूटच्या सहाय्याने अलगद बंगालच्या उपसागरात उतरलं.
उड्डाणापासून साधारण 9 मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण झाली.
नौदलाच्या टीमनं क्रू मॅाडेल पुन्हा सुरक्षितपणे समुद्रातून बाहेर काढलं.
पाच सेकंद आधी उड्डाण का थांबवलं होतं?
श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून 21 ॲाक्टोबर 2023 रोजी सकाळी आठ वाजता होणारं या यानाचं उड्डाण आधी अर्ध्या तासानं पुढे ढकलण्यात आलं होतं.
8:30 वाजता ते पुन्हा पुढे ढकलला गेलं.
8:45 नंतर उड्डाणाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली, पण उड्डाणासाठी अवघे पाच सेकंद उरलेले असताना ही प्रक्रिया नियंत्रित करणाऱ्या स्वयंचलित सिस्टिमनं उड्डाण रद्द केलं.
इस्रो चे प्रमुख एस सोमनाथ यांनी त्यानंतर याविषयी स्पष्टीकरण दिलं.
"आज TV-D1च्या उड्डाणाचा प्रयत्न करता आला नाही. सुरुवातीला 8 वाजता उड्डाण होणार होतं. पण हवामान योग्य नसल्यानं ते पुढे ढकलावं लागलं.”
सोमनाथ पुढे म्हणाले, “ॲाटोमॅटिक लॅांच सिक्वेन्स (उड्डाणाचा स्वयंचलित क्रम) व्यवस्थित सुरू होता, पण शेवटच्या क्षणी इंजिन योग्य पद्धतीनं सुरू झालं नाही.”
नंतर तांत्रिक गोष्टींची पूर्तता केल्यावर यानाची चाचणी यशस्वीरित्या पार पडली.
भारताच्या गगनयान मोहीमेचं चाचणी उड्डाण अगदी ऐनवेळी, म्हणजे जेमतेम पाच सेकंद बाकी असताना थांबवावं लागलं होतं
गगनयान मोहिमेअंतर्गत इस्रो ज्या यानातून भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे, त्या यानाची ही एक सुरक्षा चाचणी होती. TV-D1 असं नाव या चाचणी मोहिमेला देण्यात आलं होतं.
त्याअंतर्गत श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून 21 ॲाक्टोबर 2023 रोजी सकाळी आठ वाजता होणारं या यानाचं उड्डाण आधी अर्ध्या तासानं पुढे ढकलण्यात आलं होतं.
8:45 नंतर उड्डाणाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली, पण उड्डाणासाठी अवघे पाच सेकंद उरलेले असताना ही प्रक्रिया नियंत्रित करणाऱ्या स्वयंचलित सिस्टिमनं उड्डाण रद्द केलं.
इस्रो चे प्रमुख एस सोमनाथ यांनी त्यानंतर याविषयी स्पष्टीकरण दिलं.
"आज TV-D1च्या उड्डाणाचा प्रयत्न करता आला नाही. सुरुवातीला 8 वाजता उड्डाण होणार होतं. पण हवामान योग्य नसल्यानं ते पुढे ढकलावा लागलं.”
सोमनाथ पुढे म्हणाले, “ॲाटोमॅटिक लॅांच सिक्वेन्स (उड्डाणाचा स्वयंचलित क्रम) व्यवस्थित सुरू होता, पण शेवटच्या क्षणी इंजिन योग्य पद्धतीनं सुरू झालं नाही”
प्रत्यक्षात यान सुरक्षित असून नेमकं काय गडबड झाली हे आम्हाला शोधावं लागेल असंही ते म्हणाले.
TV-D1 चाचणीसाठी नवी तारीख लवकरच निश्चित केली जाईल.
यानंतरच्या काळातही किमान सहा वेगवेगळ्या चाचण्यांचे टप्पे पार केल्यावरच प्रत्यक्ष अंतराळवीरांना घेऊन गगनयान उड्डाण करेल. 2025 मध्ये हे उड्डाण होणं अपेक्षित आहे.
2022 साली तीन भारतीयांना 7 दिवसांसाठी अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेला केंद्र सरकारनं 2018 मध्ये मंजुरी दिली होती.
'गगनयान' नावाच्या या मोहिमेसाठी 10 हजार कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती तत्कालीन केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली होती.
ही मोहीम यशस्वी झाल्यास अंतराळात माणसाला पाठवणारा भारत चौथा देश ठरेल. मात्र आजच्या घटनेमुळे भारताला आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे.
यापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनी ही मोहीम फत्ते केली आहे.
भारतीयांना अंतराळात पाठवण्याचा हा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2018 जाहीर केला होता. 2022 पर्यंत देशातील एखाद्या तरुणाला अथवा तरुणीला अंतराळात पाठवण्यात येईल, असं मोदींना लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात म्हटलं होतं.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO किंवा इस्रो) हे काम 2022पर्यंत पूर्ण करेल, असं इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सीवान यांनी त्यावेळी सांगितलं होतं.
याच मोहिमेच्या सुरुवातीला इस्रोनं नोव्हेंबर महिन्यात GSLV मार्क £D या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं.
भारताच्या या घोषणनंतर पाकिस्तानही चीनच्या मदतीनं त्यांच्या नागरिकाला अंतराळात पाठवण्याची योजना आखत आहे, अशी त्यावेळी चर्चा होती.
नुकत्याच झालेल्या चांद्रयान मोहिमेनंतर आता इस्रोच्या मोहिमांवर देशाचं लक्ष असतं. चांद्रयान नंतर आदित्य एल-1 हेही मिशन इस्रोने अंमलात आणलं होतं.
गगनयान मोहिमेत पुढे काय होईल?
क्रू एस्केप मोड्यूलची चाचणी यशस्वी झाल्याने आता गगनयान मोहिमेचा पुढचा मार्ग मोकळा झाला आहे.
पण यानंतरच्या काळातही किमान पाच ते सहा वेगवेगळ्या चाचण्यांचे टप्पे पार करायचे आहेत.
त्या चाचण्या यशस्वी झाल्यावरच प्रत्यक्ष अंतराळवीरांना घेऊन गगनयान उड्डाण करेल. 2025 मध्ये हे उड्डाण होणं अपेक्षित आहे.