Dharma Sangrah

स्वच्छ भारतसाठी सार्वजनिक शौचालयांना ‘विशेेष क्रमांक’

Webdunia
सोमवार, 11 डिसेंबर 2017 (08:46 IST)

यापुढे स्व च्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात येणार्‍या सार्वजनिक शौचालयांना ‘विशेेष क्रमांक’ दिला जाणार आहे. शौचालयांच्या प्रवेशद्वारावरच हा क्रमांक टाकलेला असेल. योग्य देखभाल राखली जावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  

याशिवाय कोणत्या स्थानिक स्वराज संस्थेने हे शौचालय बांधले, देखभाल करणार्‍या संस्थेची संपूर्ण माहिती, कंत्राटदार आणि त्याचा संपर्क क्रमांक याचीही माहिती शौचालयांवर असणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात 2 लाख 34 हजार सार्वजनिक शौचालये बांधली जाणार आहेत. त्यांच्या स्वच्छता आणि देखभालीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

यात अस्वच्छता दिसल्यास तक्रार कोणाकडे करायची, याची माहिती लोकांना व्हावी त्यादृष्टीने हे निर्णय घेण्यात आले आहे. यासंदर्भात गृह आणि शहरी विकास मंत्रालयाने चार हजार महापालिका आयुक्‍तांना पत्रे पाठवली आहेत. लोकांना शौचालयासंदर्भात सविस्तर माहिती दिली जावी, असे या पत्रात म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments