Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात स्वाइन फ्लू, तीन दिवसात चार जण दगावले

Webdunia
शुक्रवार, 10 मार्च 2017 (09:45 IST)
पुण्यामध्ये गेल्या तीन दिवसात स्वाइन फ्लूने चार जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.  तर  या आजाराची लागण झालेले आणखी चार रूग्ण अतिदक्षता विभागात व्हेटींलेटरवर आहेत. काही दिवसांपासून शहरातील हवामानात मोठे बदल झाले असून रात्री थंडी तर दिवसा कडक उन आहे. हे वातारण हे आजाराच्या विषाणूसाठी पोषक असल्याने मागील दोन आठवडयांपासून या आजाराच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. 1 जानेवारी 2017 अखेर पर्यंत सुमारे 8 जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून त्यातील 4 जणांचा मृत्यू मागील तीन दिवसांमध्ये झालेला आहे. तर आणखी सात जणांवर शहरातील वेगवेगळया रूग्णांमध्ये उपचार सुरू असून त्यातील चार रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. प्रामुख्याने पाच वर्षापेक्षा लहान बालके, 65 वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि ज्या व्यक्तींना ह्रुदय, मूत्रपिंड, उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींना या आजारापासून सर्वाधिक धोका आहे. दरम्यान, या आजारावर औषधे उपलब्ध असून वेळीच उपचार घेतल्यास तो बरा होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments