तामिळनाडूच्या मदुराईमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मदुराई येथे एका ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान अन्य 20 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मदुराई रेल्वे स्थानकाजवळील बोडी लेन येथे उभ्या असलेल्या पर्यटक ट्रेनला शनिवारी पहाटे आग लागली. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
ट्रेन रामेश्वरमला जात होती. तिचे नाव पुनालूर मदुराई एक्सप्रेस असे सांगितले जात आहे. मृत्युमुखी पडलेले बहुतांश लोक उत्तर प्रदेशातील आहेत. पहाटे 5.15 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. त्यावेळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवण्यात आली होती.
पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसच्या एका खाजगी/वैयक्तिक डब्याला आज पहाटे 5:15 वाजता मदुराई यार्ड येथे आग लागल्याचे वृत्त आहे. आग आटोक्यात आली असून इतर डब्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही.
मदुराई रेल्वे स्थानकावर सकाळी 05.15 वाजता एका डब्यात आग लागली. या डब्यात यात्रेकरू होते आणि ते उत्तर प्रदेशातून प्रवास करत होते. आज सकाळी त्यांनी कॉफी बनवण्यासाठी गॅसची शेगडी पेटवण्याचा प्रयत्न केला असता सिलिंडरचा स्फोट झाला. आतापर्यंत 55 जणांना वाचवण्यात यश आले असून 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य सुरू आहे.