15 ऑगस्ट रोजी देशाची राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. दिल्लीत पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, हॉट एअर बलून, पॅरा जंपिंग आणि ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे.
ही बंदी पुढील 15 दिवस लागू राहणार आहे. 2 ऑगस्ट ते 16 ऑगस्टपर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. धोका लक्षात घेऊन आदेश जारी करण्यापूर्वी दिल्ली पोलिस आयुक्तांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावाही घेतला.त्यांनी सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.
15 ऑगस्ट रोजी टार्गेट किलिंगची माहिती मिळाली आहे. या बाबात पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात देशाचे नेतृत्व करतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचे उदाहरण देत दिल्लीत अशा घटना घडू नयेत,त्यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी दिले आहे.