Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान आज दुपारी ४ वाजता देशाला संबोधित करणार

Webdunia
मंगळवार, 30 जून 2020 (08:22 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी ३० जून रोजी संध्याकाळी ४ वाजता देशाला संबोधित करतील. एकीकडे कोरोना विषाणूची आकडेवारी वेगाने वाढत आहे, दुसरीकडे, गलवाना खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारत-चीनमध्ये तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींनी मंगळवारी देशाला केलेले भाषण अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. 
 
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात देशवासियांना संबोधित करताना कोरोना ते वादळ, टोळधाड तसंच लडाखमध्ये शहीद झालेल्या सैनिकांचा उल्लेख केला होता. पीएम मोदी म्हणाले होते की शेकडो हल्ले केले गेले, परंतु भारत डगमगला नाही. लडाखवर ज्यांनी नजर ठेवली त्यांना चोख प्रत्युत्तर मिळालं आहे. त्याच वेळी ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की कोरोनाच्या संकटाच्या वेळी देश लॉकडाऊनमधून बाहेर आला आहे. आता आपण अनलॉक करण्याच्या मार्गावर आहे असे सांगतिले होते.

संबंधित माहिती

नेपाळमध्ये राजकीय गट आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात संघर्ष

हिथ्रो विमानतळावर दोन विमानांची टक्कर, कोणतीही दुखापत नाही

Chess: आर प्रज्ञानानंद हा देशबांधव डी गुकेशकडून पराभूत

दक्षिण-पश्चिम सीरियामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सात मुले ठार

भारतीय पुरुष हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव

पुढील लेख
Show comments