Marathi Biodata Maker

आईचा फोटो बघून चोराने परत केले पाकीट

Webdunia
चोरांनादेखील भावना असतात हे या घटनेवरून सिद्ध होते. ही घटना आहे मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथील. एका चोराने एका व्यक्तीचे पाकीट मारले आणि ते उघडून बघितले तर त्यात 1200 रुपये, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्ससारख्या महत्त्वाच्या गोष्टी व अजून एक विशेष गोष्ट होती ती म्हणजे आईचा फोटो.
 
पाकिटात असलेला आईचा फोटो पाहून चोर इतका भावुक झाला की त्याने ते पाकीट मालकाला परत केले. होशंगाबाद येथील अमर चौक येथे राहणार्‍या अस्लम याचे ते पाकीट होते. चोराने कुरिअर करून ते पाकीट त्याला परत केले. पाकीट परत मिळाल्यानंतर अस्लम याने सांगितले की 25 जुलैला तो पत्नीच्या उपचारासाठी फरीदाबाद येथे गेला होता. त्याचवेळेस तो दिल्लीच्या बाजारातदेखील गेला. बाजारात फिरताना त्याचे पाकीट कोणीतरी मारले. त्यानंतर त्याने दिल्लीच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
 
अस्लमने सांगितले की पाकीट चोरी झाल्यानंतर दोन महिन्यांनी माझ्या घरी एक कुरिअर आले. त्यात माझे हरवलेले पाकीट होते आणि त्यात एक चिठ्ठीदेखील होती. त्यावर एक नंबर लिहिला होता. त्या नंबरवर त्याने फोन केल्यावर पलीकडून सांगण्यात आले की 1200 रुपये सोडून सगळ्या वस्तू परत करत आहे.
 
त्याव्यतिरि‍क्त अस्लमने सांगितले की पाकीट परत करणार्‍या चोराने सांगितले की, मी पण माझ्या आईवर खूप प्रेम करतो. पाकिटातील आईचा फोटो पाहून तूदेखील आईचा लाडका आहेस, असे दिसते. म्हणून पाकीट कुरिअरने परत पाठवत आहे. या सर्व घटनेनंतर अस्लमने दिल्ली पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पाकीट मिळाल्याचे कळवले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments