पुन्हा एकदा आपल्या सैनिकांनी आपली ताकत सिद्ध केली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान काश्मीर खोऱ्यातील पुलवामाच्या हकरीपोरामध्ये लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानाचा खात्मा केला आहे. त्यामुळे या ठिकाणी दहशत वादी लोकांना फार मोठा धक्का बसला आहे. या सोबत अजून दोन ते तीन
अतिरेक्यांनाही ठार केले आहे. दहशतवाद्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अबु दुजानाच्या शोधात भारतीय सैन्य अनेक दिवसांपासून होते. सैन्याने अनेक ऑपरेशनही केले होते तर या खतरनाक असलेल्या अतिरेक्यावर 10 लाखांचं बक्षीस होते. यावेळी कारवाई करत असताना सीआरपीएफची 182 बटालियन, 183 बटालियन, 55 राष्ट्रीय रायफल आणि एसओजीच्या पथकाने हे पूर्ण केले आहे. पहाटे हे पूर्ण ऑपरेशन केले गेले आहे.