Festival Posters

त्रिपुरा विधानसभेत तृणमूल आमदाराने राजदंड पळवला

Webdunia
मंगळवार, 20 डिसेंबर 2016 (15:38 IST)
त्रिपुरा विधानसभेत तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते सुदीप रॉय बर्मन यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड घेऊन सदनाबाहेर पळ काढला. यावेळी सदनाच्या मार्शल्सनी पकडण्याआधीच सुदीप रॉय सभागृहाबाहेर गेले होते. त्रिपुराचे वन आणि ग्रामीण विकासमंत्री नरेश जमातिया यांच्यावर सेक्स स्कॅण्डलशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. यावर आमदार सुदीप बर्मन यांनी चर्चेची मागणी केली होती. परंतु विधानसभा अध्यक्षांनी चर्चा करण्यास  नकार दिल्याने सुदीप बर्मन त्याचा विरोध करत होते. दरम्यान, त्रिपुरा विधानसभेत असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी पाच वेळा त्रिपुरा विधानसभा अध्यक्षांनी त्यांचं अधिकार चिन्ह गमावलं होतं.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख