दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने सर्वच हैराण झालेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे. या दरवाढीमुळे ट्रक व्यावसायिकांची चिंता वाढवली आहे. डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने त्यांनी वाहतुकीचे भाडेही वाढवले असून वाढीव भाडे देण्यास व्यापारी मात्र नकार देत असल्याचे चित्र आहे. तर एसटी महामंडळाने १ जूनपासून तिकीट दरात ३० टक्क्यांनी वाढ करण्याचे संकेत दिलेत. तसेच भाजीपालाही महाग होत आहे. परिणामी, महागाईला निमंत्रण मिळत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूकदारांनी भाडेवाढीची मागणी केलेय. बाजारात मालवाहतूक ट्रकच्या नोंदणी घटल्या असून व्यवसायात कमालीची मंदी आली आहे. मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस येत्या २० जुलैला देशभरात संप पुकरणार आहे.