rashifal-2026

उत्कल एक्स्प्रेस दुर्घटना : रेल्वेकडून ८ अधिकाऱ्यांवर कारवाई

Webdunia
सोमवार, 21 ऑगस्ट 2017 (09:53 IST)
मुजफ्फरनगरमधील उत्कल एक्स्प्रेस दुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासनाने आठ अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. ज्युनियर इंजिनियर, सिनियर सेक्शन इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, सिनियर डिव्हिजन इंजिनियर यांचं निलंबन, उत्तर रेल्वेचे मुख्य चीफ ट्रॅक इंजिनियरची बदली, तर डीआरएफ दिल्ली, उत्तर रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि रेल्वे बोर्डाचे मेंबर इंजिनियर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
 
मुजफ्फरनगरमधील खतौलीमध्ये उत्कल एक्प्रेसच्या अपघातात 14 डबे रुळावरुन घसरले. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून, 90 हून अधिक जण जखमी झाले आहे. यातील 22 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर मुजफ्फरनगर, मेरठ आणि हरिद्वारमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments