Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हैदराबादमधील दुर्गा पंडालमध्ये तोडफोड, गुन्हा दाखल

Webdunia
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (23:05 IST)
हैदराबादमध्ये दुर्गा मातेच्या पंडालमध्ये तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञातांनी पुतळ्याची मोडतोड केली आहे. तसेच दुर्गा देवीची साडीही देखील फेकली आहे. तसेच ऑल इंडिया इंडस्ट्रियल एक्झिबिशन सोसायटीच्या आयोजकांनीही या घटनेच्या विरोधात निदर्शने केली आहे याची माहिती समोर आली आहे.
 
तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील नामपल्ली येथे असलेल्या दुर्गा मातेच्या पंडालची काही अज्ञातांनी तोडफोड केली आहे. देवीच्या मूर्तीचेही  नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी केस दाखल करून तपास देखील सुरु केला आहे. 
 
एका पोलीस अधिकारींनी सांगितले की, अज्ञात लोकांनी पहाटे देवीच्या मूर्तीच्या एका हाताचे नुकसान केले आहे.  तसेच मुर्तीची जीर्णोद्धार करण्यात आली असून देवीची पूजा सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेत्या माधवी लता यांनी पंडालला भेट असून  गेल्या काही वर्षांपासून पूजा पंडालमध्यअश्या घटना घडत असल्याचे सांगितले आहे. जर असेच चालू राहिले तर आम्ही गप्प बसणार नाही.असे देखील त्या म्हणाल्या आहे.  

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

पुढील लेख
Show comments