Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

Webdunia
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील परंतू हैदराबाद येथील एका तरुणाने आपलं कार्ड जरा वेगळं छापवले आहे. 27 वर्षीय यांदे मुकेश राव यांनी आपल्या लग्नात आमंत्रित पाहुण्यांना विनंती केली आहे की लग्नात आहेर आणू नये परंतू आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना मत देण्याचा वादा करा.
 
तेलंगण रहिवासी राव यांनी आपल्या लग्नाच्या पत्रिकेवर एक संदेश प्रिंट करवले आहे. ज्यात लिहिले आहे की "2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना मत हेच आहेर आहे." या संदेशाच्या दोन्ही बाजूला कमळाचे फुलं प्रिंट करण्यात आले आहे.
 
तेलंगण स्टेट पावर जनरेशन कॉर्पोरेशन (टीएस जेनको) मध्ये असिस्टेंट इंजिनियर म्हणून कार्यरत राव यांचा विवाह 21 फेब्रुवारी आहे. राव यांना मोदी भक्त असल्याचं कौतुक आहे.
 
राव यांच्याप्रमाणे, "आम्ही आपल्या दैनिक कामात व्यस्त असतो अशात देशासाठी वेळ काढणे कठिण जातं. किमान आम्ही मोदींचे समर्थन तर नक्कीच करू शकतो."
 
त्यांनी म्हटले की, "मोदींच्या विरोधात अनेक लोकं आहेत तरी मी प्रत्येक शनिवारी तीन तास आपल्या ऑफिसच्या कार्यक्रमात भाग घेऊन स्वच्छ भारत सारख्या योजनेचं समर्थन करतो."
 
राव यांना या कामासाठी कुटुंबाच्या लोकांचा विरोध झेलावा लागला तरी त्यांना या गोष्टीसाठी पटवले. समर्थन दर्शवण्याचा आणि समर्थन प्राप्तीचा मी निवडलेला मार्ग मी घरच्यांना पटवून दिला.
 
उल्लेखनीय आहे की मागील महिन्यात सूरतमधील गुजराती दंपतीने देखील आपलं लग्नाचं कार्ड विशेष प्रकारे डिझाइन करवले होते. ज्यात एका पानावर राफेल फाइटर जेट्स खरेदीसाठी एनडीए सरकारचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले होते. या व्यतिरिक्त पाहुण्यांना 2019 लोकसभा निवडणुकीत मोदींना मत देण्याची अपील केली गेली होती.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments