Festival Posters

सरकारकडून व्हॉट्स अॅपला दुसऱ्यांदा नोटीस

Webdunia
शुक्रवार, 20 जुलै 2018 (08:41 IST)
केंद्र सरकारने इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपला दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे. यात अफवांना व चिथावणीखोर मेसेजेसना थांबवण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्यास सांगितलं आहे. अन्यथा ज्या माध्यामातून अफवा पसरवल्या जात आहेत त्यांनाही दोषी मानलं जाईल आणि त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल असं या नोटीसमध्ये सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
व्हॉट्स अॅपनं यासंदर्भात सरकारकडे खुलासा करत हिंसेच्या अघोरी घटनांनी आम्हीदेखील व्यथित झाल्याचं म्हटलं होतं. तसेच या समस्येवर लगेच काहीतरी तोडगा काढावा अशी आमचीही इच्छा असल्याचं व्हॉट्स अॅपनं सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर व्हॉट्स अॅपने पहिल्यांदाच देशातील मुख्य वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन नागरिकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला होता. वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीत व्हॉट्स अॅपकडून खोट्या मेसेजपासून सावध राहण्याच्या 10 टीप्सही देण्यात आल्या, तसंच फॉरवर्डेड मेसेज ओळखण्यासाठी एक फिचरही सुरू केल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments