Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नानंतर सासरी जात असताना प्रियकराने नववधूवर गोळी झाडली

Webdunia
गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (13:14 IST)
हरियाणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विदाईनंतर सासरी जात असरणार्‍या नववधूला तिच्या प्रियकराने गोळ्या घातल्या आहेत. ही घटना रोहतकची आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वधूला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यानंतर बातमी समोर आली की ज्याने वधूवर गोळी झाडली तो तिचा पूर्वी प्रियकर होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही घटना शुक्रवारी घडली. लग्नानंतर निरोप घेऊन नववधू सासरच्या घरी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, वराचा भाऊ सुनील गाडी चालवत होता. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही कार गावातील शिवमंदिराजवळ येताच मागून इनोव्हा कारमधील काही तरुणांनी हल्ला करून वधूच्या गळ्यातील मंगळसूत्रावर गोळीबार करून वराच्या भावाच्या अंगावरील सोन्याची चेन हिसकावून नेली. ही घटना नवरीचा प्रियकर आणि तिच्या साथीदारांनी घडवून आणल्याचे बोलले जात आहे. 
 
कुटुंबाची वाईट स्थिती
दरम्यान, घटनेत वापरलेली इनोव्हा कार ही सांपला येथील वीटभट्टी मालकाला पिस्तुलाच्या जोर दाखवून हिसकावून घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांचे रडून रडून बेहाल झाले आहे. पोलिसांना अद्याप आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments