Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्र 2021: देवीचे 9 शुभ दिवस 9 शुभ नैवेद्य

नवरात्र 2021: देवीचे 9 शुभ दिवस 9 शुभ नैवेद्य
, गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (11:15 IST)
यंदा शारदीय नवरात्र 7 ऑक्टोबर रोजी गुरुवारपासून सुरु होणार आहे आणि 15 ऑक्टोबर रोजी संपेल. दसऱ्याचा सण देखील याच दिवशी साजरा केला जाईल. या 9 दिवसात उपवास करण्याचे महत्त्व आहे. उपवासात अनेक लोक उपवासाच्या गोष्टी जसे की खिचडी, फळे वगैरे खातात, तसेच आईच्या पूजेच्या वेळी त्यांना अनेक प्रकारचे भोग अर्पण केले जातात. येथे जाणून घ्या 9 दिवसांसाठी कोणते 9 नैवेद्य देवीला अपिर्त करावे.
 
देवीला हे 9 नैवेद्य दाखवावे- पहिल्या दिवशी तूप, दुसऱ्या दिवशी साखर, तिसऱ्या दिवशी खीर, चौथ्या दिवशी मालपुआ, पाचव्या दिवशी केळी, सहाव्या दिवशी मध, सातव्या दिवशी गूळ, आठव्या दिवशी नारळ आणि नवव्या दिवशी तीळ. यासह, प्रत्येक प्रांतात तेथील स्थानिक पदार्थ अर्पण करण्याची परंपरा देखील असते.
 
1. खीर: खीर अनेक प्रकारे तयार केली जाते. खीरमध्ये मनुका, बारीक चिरलेले बदाम, नारळ, काजू, पिस्ता, चारोळी, मकाणे, सुगंधासाठी वेलची, केशर आणि शेवटी तुळस घालावी. खीर अनेक देवांना अर्पित केली जाते. विशेषतः भगवान विष्णू आणि दुर्गामातेला खिरीचा नैवेद्य आवडतो. तांदूळ आणि शेवयाची खीर पसंत केली जाते.
 
2. मालपुए: अपूप हे एका औषधाचे नाव आहे, परंतु मालपुआला 'अपूप' असेही म्हणतात. 'अपूप' ही भारतातील सर्वात जुनी गोड मिठाई आहे, ज्याचा उल्लेख ऋग्वेदातही आहे. ऋग्वेदात घृतवंत अपुपाचे वर्णन आहे. पाणिनीच्या काळात, लग्न-मिरवणुका, तीज-सणांवर पूरण भरलेले अपूप बनवले जातात. ते आजही प्रचलित आहे. जोपर्यंत हलव्याचा प्रश्न आहे, पूर्वी त्याला 'संयाव' म्हटले जात असे. होळी आणि दीपावलीच्या दिवशी मालपुआ अनेकदा बनवले जातात. दुर्गा देवीला मालपुआ खूप आवडतो.
 
3. गोड शिरा: भारतीय समाजात शिर्‍याला खूप महत्त्व आहे. जसे रव्याचा शिरा, मैद्याचा शिरा, गाजराचा शिरा, मुगाचा शिरा, भोपळ्याचा शिरा, दुधी भोपळ्याचा शिरा इ. यातून रव्याच्या शिर्‍याचं नैवेद्य दाखवलं जातं. रव्याच्या शिर्‍यात सर्व प्रकारचे ड्राय फ्रूट्स मिसळून ते उत्तम प्रकारे बनवा आणि देवाला अर्पण करा. माता दुर्गा आणि हनुमानजींना शिर अत्यंत पसंत आहे. 
 
4. पुरण पोळी: गूळ आणि हरभरा डाळ मिसळून पुरण पोळी बनवली जाते. ज्याप्रमाणे बट्ट्याचे पराठे तयार केले जातात त्याच प्रकारे गूळ किंवा साखर आणि शिजवलेली चण्याची डाळ याचे मिश्रण तयार करुन गोड पोळी तयार केली जाते. महाराष्ट्रात या पदार्थांची वेगळ्याने व्याख्या करण्याची गरज नाही. यात घालण्यात येणार्‍या वेलची पूड आणि जायफळ मुळे चव वाढते. सणासुदी आणि नवरात्रीच्या निमित्ताने ही पोळी तयार केली जाते. दुर्गा देवी पुरण पोळी अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
5. गोड बूंदी : बेसन, वेलची आणि तुपाने तयार गोड बुंदीचा स्वाद वेगळाच असतो. नमकीन बुंदी दहीसोबत रायता तयार करण्यासाठी वापरली जाते तर गोड बुंदीचा देवीला नैवेद्य दाखवला जातो.
 
6. घेवर : घेवर देखील छप्पन भोग पैकी एक आहे. हे कणिक किंवा मैद्याने तयार केले जातात. हे मधमाश्यांच्या पोळ्यासारखे गोल आणि छिद्र असलेलं दिसतं आणि ही एक कुरकुरीत आणि गोड डिश आहे. कोणताही तीज किंवा सण घेवणशिवाय अपुरे मानले जातात. असे मानले जाते की दुर्गा देवीला हे खूप आवडतात. घेवर राजस्थान आणि ब्रज प्रदेशातील प्रमुख पारंपारिक गोड पदार्थ आहे.
 
7. फळं: फळांमध्ये डाळिंब, केळी आणि नारळ देवला अर्पित करता येतात.
 
8. मिठाई : मिठाईमध्ये पिवळा पेढा आणि गुलाब जामुन अर्पित करावे.
 
9. इतर पदार्थ : इतर पदार्थ म्हणजे तुप, मध, तीळ, काळे चणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. या व्यतिरिक्त देवीसाठी आपण केशरी भात, कढी, पुरी-भाजी, भजे, भोपळा किंवा बटाट्याची भाजी तयार करुन देखील नैवेद्य दाखवू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शारदीय नवरात्र 2021: लाल किताबनुसार नवरात्रीमध्ये हे काम करा, फायदा होईल