Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सातवी माळ: कालरात्री पूजा, मंत्र आणि स्तोत्र

Webdunia
रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (09:21 IST)
7th Day of Navratri शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी माता कालीचे विशेष पूजन होतं आणि मंत्रांचा जप केल्याने देवी प्रसन्न होऊन सर्वत्र विजय प्रदान करते. जाणून घ्या कालरात्री पूजन विधी आणि विशेष मंत्र- Maa kalratri puja vidhi and mantra
 
ही देवी सर्व प्रकाराचे रोग दूर करणारी, विजय वरदान देणारी, सर्व विकार दूर करणारी देवी मानली जाते. या देवीची आराधना करुन देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा. प्रसाद आपण ही ग्रहण करावा ज्याने आरोग्यावर चांगले परिणाम होतात.
 
कालरात्री देवी पूजन विधी Maa Kalratri Puja vidhi
 
- नवरात्रीच्या सप्तमी तिथीला कालरात्री पूजन करण्यासाठी सकाळी उठून आधी स्नान करावे.
 
- आता देवीला कुंकु, अक्षता, दीप, धूप अर्पित करावं.
 
- देवीला रातराणीचे फुलं अर्पित करावे.
 
- गुळाचा नैवेद्य दाखवावा.
 
- देवीची आरती करावी.
 
- यासोबतच दुर्गा सप्तशती, दुर्गा चालीसा व मंत्र जाप करावा.
 
- या दिवशी लाल चंदन माळने देवी मंत्र जप करावा.
 
- लाल चंदन माळ उपलब्ध नसल्यास रूद्राक्षाच्या माळीने जप करावा.
 
मंत्र- kalratri mantra
 
- 'ॐ कालरात्र्यै नम:।'
 
- उपासना मंत्र
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता, लम्बोष्टी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी।
वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा, वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी॥
 
- ॐ यदि चापि वरो देयस्त्वयास्माकं महेश्वरि।।
संस्मृता संस्मृता त्वं नो हिंसेथाः परमाऽऽपदः ॐ।
 
घृत, गुग्गल, जायफळ इत्यादी अर्पण करा.
 
- 'ॐ ह्रीं श्रीं क्लीं दुर्गति नाशिन्यै महामायायै स्वाहा।'
 
कामात अडथळे निर्माण होत आहेत, शत्रू आणि विरोधक कामात अडथळे निर्माण करत आहेत, खालील मंत्राचा जप करून त्यापासून मुक्त व्हा.
- ॐ ऐं यश्चमर्त्य: स्तवैरेभि: त्वां स्तोष्यत्यमलानने
तस्य वि‍त्तीर्द्धविभवै: धनदारादि समप्दाम् ऐं ॐ।
 
पंचमेवा, खीर, पुष्प, फळ इत्यादीची आहुती द्या. दिलेले सर्व मंत्र शास्त्रीय आहेत आणि अनेक श्री दुर्गा सप्तशतीमधून उद्धृत केलेले आहेत.
 
- 'ॐ फट् शत्रून साघय घातय ॐ।'
 
स्वप्नदृष्टीचे फळ अनेक शास्त्रात सांगितले आहे. ज्याचे फळ अशुभ आहे असे स्वप्न दिसल्यास त्यावर उपाय म्हणून सकाळी जपमाळ केल्यास अशुभ फळाचा नाश होतो व शुभ फळ मिळते.
 
- ॐ ऐं सर्वाप्रशमनं त्रैलोक्यस्या अखिलेश्वरी।
एवमेव त्वथा कार्यस्मद् वैरिविनाशनम् नमो सें ऐं ॐ।।
 
होम द्रव्य, मोहरी, कालीमिरी, दालचीनी इत्यादि
 
हवनाच्या जपाचा एक दशांश, तर्पणचा एक दशांश, मार्जनाचा एक दशांश, ब्राह्मण भोजनाचा दशमांश आणि कन्या पूजा आणि अन्नदान केल्याने मंत्र सिद्धी होते.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments