Dharma Sangrah

मोबाईलच्या लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेत बदल

Webdunia
आता एअरटेल व व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांकडून लवकरच लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेत बदल केला जाणार असून ग्राहकांचा मोबाईल फोन कायम वापरात रहावा यासाठी इनकमिंग कॉलवर किमान शुल्क आकारले जाणार आहे.
 
जीओच्या स्पर्धेमुळे या कंपन्यांचा महसूल घटलाच, शिवाय त्यांना सतत आपल्या दरपत्रकातही बदल करणे भाग पडत आहे. परिणामी ग्राहकांना आता फार काळ लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसणार असला तरी मिनिटामिनिटाला येणार्‍या इनकमिंग कॉलसाठी ग्राहकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. प्रत्येक मिनिटला येणार्‍या इनकमिंग कॉलवर शुल्क आकारणी केली जाणार नाही. काही वैध कालावधीसाठी ग्राहकांनी किमान रक्कम भरुन रिचार्ज केल्यास त्यांना मोफत इनकमिंग कॉल्सचा लाभ घेता येणार आहे.
 
एअरटेलने किमान रिचार्जसाठी  35 रु., 65 रु. व 95 रु. अशा तीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेंतर्गत डाटा, टॉकटाईम व 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. याचप्रमाणे व्होडाफोन-आयडिया यांनीही लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेपासून फारकत घेत ग्राहकांसाठी दरमहा किमान 30 रु. शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

वर्धा येथील शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघात, वेगवान कार ने धडक दिली

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

वांताराच्या खास सहलीवर लिओनेल मेस्सीने भारतीय परंपरा आणि वन्यजीवांसोबतचे अविस्मरणीय अनुभव शेअर केले

माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम, मंत्रिपद धोक्यात

LIVE: पुणे–पिंपरी महापालिकेत भाजप विरुद्ध अजित पवार गट लढत होणार

पुढील लेख
Show comments