Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम डिव्हाईसचे नंबर १३ आकडी करायला सांगितलं आहेत. फक्त एम-टू-एम मोबाईल नंबरच १३ आकडी होणार असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार आहेत.
 
एम-टू-एम म्हणजेच मशीन-टू-मशीन सिस्टिम. व्यावसायिक वापरासाठी या सिस्टिमचा वापर केला जातो. या सिस्टिममध्ये दोन व्यक्तींचा एकमेकांशी संवाद होत नाही. एम-टू-एम सिस्टिम वायरलेस उपकरणांना जोडून त्याचा व्यावसायिक वापर करता येतो. एम-टू-एममध्ये डेबिट-क्रेडिट कार्डसाठी वापरण्यात येणारी स्वाईप मशिन, स्मार्ट इलेकट्रिक मिटर्स तसंच विमान आणि जहाजाला ट्रॅक करण्यासाठी जे जीपीएस वापरलं जातं, त्यासाठी एम-टू-एम सिस्टिम वापरली जाते.
 
मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली ग्राहकांची संख्या लक्षात घेता एम-टू-एमसाठी १३ अंकी नंबर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. १ जुलैपासून एम-टू-एम सिस्टिम असलेल्या डिव्हाईसचे नंबर १३ आकडी होणार आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंटरनेटच्या स्पीडमध्ये भारत अजूनही मागेच