30 नोव्हेंबर रोजी वनप्लस 6टी चा थंडर पर्पल व्हेरिएंट लॉन्च होण्याची शक्यता

शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (13:07 IST)
चिनी कंपनी वनप्लसने नुकतेच वर्षातील दुसरे फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 6टी लॉन्च केला आहे. वनप्लस 6 प्रमाणे, नवीन वनप्लस 6टी स्मार्टफोन देखील मिरर ब्लॅक आणि मिडनाइट ब्लॅक रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. टेक जगाच्या मते, वनप्लस आता लवकरच आणखी एक नवीन रंगाचे व्हेरिएंट लॉन्च करू शकतो. इंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार, वनप्लस 6टी चे थंडर पर्पल व्हेरिएंटवर कार्य सुरू आहे आणि महिन्याच्या शेवटी याला सादर करण्यात येईल, पण सीमित संख्येत. माहितीनुसार, जर्मनीमध्ये या कलर व्हेरिएंटची विक्री 30 नोव्हेंबर 2018 पासून सुरू होऊ शकते. हे 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह सूचीबद्ध असून याची किंमत 579 युरो (सुमारे 48,300 रुपये) आहे. त्याच किमतीत इतर दोन कलर व्हेरिएंट देखील आहे. अद्याप हे कळलेले नाही की या व्हेरिएंट्ची किंमत वनप्लस 6टी एवढी असेल की कमी, हे तर नंतरच कळेल. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्रातून निशाणा