Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Oneplus 9 series ने 3 स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहे

Webdunia
गुरूवार, 25 मार्च 2021 (21:37 IST)
भारतात नवीन Oneplus 9 series सुरु केली आहे. या मालिके अंतर्गत OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि  OnePlus 9R लॉन्च केले आहे. वनप्लस 8 सिरीज नंतर कंपनीने 9 ही सिरीज लॉन्च केली आहे. या स्मार्टफोनच्या वैशिष्टयांबद्दल बोलावे तर नवीन स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि hasselblad कॅमेरे देखील समाविष्ट आहे. 
किमती बद्दल सांगायचे तर या स्मार्टफोनमध्ये वनप्लस 9 ची किंमत 49,999 रुपये ह्याच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. या फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट ला 54,999 रुपयांत खरेदी केले जाऊ शकते. OnePlus 9 Pro च्या 8 जीबी रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत सुमारे 64,999 रुपये आहे. याचे 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेल ला  69,999 रुपयांत खरेदी केले जाऊ शकते. OnePlus 9R ची किंमत  39,999 रुपये त्याच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट साठी आहे. फोनची 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज ऑप्शन 43,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
 
वनप्लस 9 वैशिष्ट्ये-
वनप्लस 9 मध्ये 6.55-इंच एएमओएलईडी डिस्प्ले आहे ज्यात एफएचडी + रेजोल्यूशन आहे.डिस्प्ले 120Hz रीफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लासद्वारे संरक्षित आहे. फोनमध्ये अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम आहे. स्मार्टफोनमध्ये 5nm स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आहे.या फोनमध्ये 8 जीबी किंवा 12 जीबी रॅम आणि 128 जीबी किंवा 256 जीबी स्टोरेज आहे.
फोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500 एमएएच बॅटरी आहे. वनप्लस 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचे सेन्सर, 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनच्या फ्रंटला  16-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. 
 
वनप्लस 9 प्रो वैशिष्ट्ये
वनप्लस 9 प्रो मध्ये 6.7 इंचाची क्यूएचडी + एमोलेड डिस्प्ले आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटचे सपोर्ट आणि कॉर्निंग ग्लास संरक्षण आहे. फोनमध्ये Android 11 ऑपरेटिंग सिस्टमसह ऑक्सिजन ओएस 11आहे. फोनमध्ये 5nm स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आहे. यात 8 जीबी किंवा 12 जीबी रॅम आणि 128 जीबी किंवा 256 जीबी स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये 4,500 एमएएच बॅटरी आहे, जी 65 डब्ल्यू फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50 W फास्ट वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करतो.
स्मार्टफोनमधील कॅमेर्‍याविषयी सांगायचे तर फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सलचा कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा सेन्सर समाविष्ट आहे. फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
 
वनप्लस 9 आर वैशिष्ट्ये
हा स्मार्टफोन गेमर्स वर केंद्रित आहे. फोनमध्ये फ्लेक्सिबल ओएलईडी पॅनेल आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आहे. यात 8/12 जीबी रॅम आणि 128/256 जीबी स्टोअरचे पर्याय आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. यात 65 W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4,500 एमएएच बॅटरी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

अजित पवार म्हणाले मुंडेंना विचारा की ते मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे का?

अकोला : हातरुण गावात मुले चोरीच्या अफवेवरून गावकऱ्यांनी चार तरुणांना केली मारहाण

LIVE: अकोला जिल्ह्यात गावकऱ्यांनी चार तरुणांना केली बेदम मारहाण

कमी शिजवलेले चिकन खाऊ नका ते धोकादायक आहे, अजित पवारांनी हा इशारा का दिला?

अपार्टमेंटमध्ये आढळले एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह

पुढील लेख
Show comments