rashifal-2026

ड्युअल कॅमेरा आणि ऑक्टाकोर प्रोसेसरसह या फोनची किंमत 4,999 रुपये आहे

Webdunia
शुक्रवार, 17 मे 2019 (18:03 IST)
आपण खूप स्वस्त स्मार्टफोन शोधत असाल, ज्याची किंमत तर कमी असावी पण त्याच किमतीत आपल्याला सर्व नवीन फीचर्स हवे असतील तर बाजारात Itel द्वारे आपल्यासाठी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला गेला आहे. या फोनमध्ये आपल्याला फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक व्यतिरिक्त ड्युअल रीअर कॅमेरा मिळेल. 
 
* Itel A46 तपशील - या फोनमध्ये आपल्याला ड्युअल सिम सपोर्टसह 5.45 इंच HD+ डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिझोल्यूशन 720x1440 पिक्सेल आहे. Itel A46 च्या प्रोसेसरबद्दल सांगू तर यात मिडियाटेक 1.6GHz ऑक्टो-कोर प्रोसेसर उपलब्ध होईल, तथापि, कंपनीने प्रोसेसरच्या व्हर्जनची काहीच माहिती जाहीर केली नाही. या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज मिळेल, ज्याला आपण मेमरी कार्डच्या मदतीने 128 जीबी पर्यंत वाढवू शकता.
 
* Itel A46 कॅमेरा - यात ड्युअल रीअर कॅमेरा आहे ज्यात एक कॅमेरा 8 मेगापिक्सेल आणि दुसरा व्हिजीए कॅमेरा आहे. कॅमेर्‍यासह आर्टिफिशियल इंटेलिजेंस सपोर्ट मिळेल. फोनमधील फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे. आपल्याला दोन्ही कॅमेऱ्यासह फ्लॅश लाइट मिळेल. फोनमध्ये फेस अनलॉक देखील दिला गेला आहे.
 
* Itel A46 बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी - या फोनमध्ये 2400mAh ची बॅटरी मिळेल. या व्यतिरिक्त ड्युअल 4 जी व्हीओएलटीई, अँड्रॉइड पाई, वाय-फाय, ब्लूटुथ आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक मिळेल. आपल्याला फोनसह बॉक्समध्ये एक कव्हर देखील मिळेल.
 
* Itel A46 किंमत आणि ऑफर्स - Itel A46 ची किंमत 4,999 रुपये आहे आणि हा फोन डार्क वॉटर, ग्रेडियंट डायमंड ग्रे, फियरी रेड आणि नियॉन वॉटर कलर व्हेरिएंट्समध्ये मिळेल. लॉन्चिंग ऑफर्सबद्दल सांगायला गेलो तर या फोनसह, जिओकडून 50 जीबी डेटा आणि 1,200 रुपये कॅशबॅक मिळेल. यासह कंपनी 100 दिवसांची स्क्रीन रिप्लेसमेंट गारंटी देत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र आरोग्य विभागाने 'नाईट स्क्वॉड' सुरू केले

श्रीलंकेत चक्रीवादळाचा हाहाकार

मुंबईची खराब हवा ही हंगामी समस्या नाही तर सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे; खासदार मिलिंद देवरा यांनी बीएमसी आयुक्तांना पत्र लिहिले

मुंबई-नाशिक महामार्गावर अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला

सोलापूर: स्वच्छतेच्या मुद्द्यांवरून बस स्टँड डेपो मॅनेजर निलंबित

पुढील लेख
Show comments