Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Samsung Galaxy A13 5G: सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G मोबाईल लॉन्च,किंमत जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (18:05 IST)
Samsung Galaxy A13 5G: सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G मोबाईल ग्राहकांसाठी उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात आला आहे. हा सॅमसंग 5G स्मार्टफोन कंपनीचा सर्वात परवडणारा 5G मोबाइल फोन आहे, जो 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 90 Hz रिफ्रेश रेटसह आणला गेला आहे. Samsung Galaxy A13 5G च्या फीचर्सपासून ते किंमती पर्यंत जाणून घ्या 
या सॅमसंग मोबाईल फोनमध्ये 720x1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा इन्फिनिटी-व्ही एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा फोन 90 Hz रिफ्रेश रेटसह लॉन्च करण्यात आला आहे.
या मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 700 ऑक्टा-कोर  प्रोसेसर, 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज आहे.मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवणे शक्य आहे. 
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर या सॅमसंग स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेरे, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आणि 2 डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. 
5000 mAh बॅटरी 15 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह प्रदान केली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, ड्युअल-बँड वाय-फाय, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि युजर्स  NFC द्वारे पैसे देऊ शकतात. सुरक्षेसाठी फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Samsung Galaxy A13 5G किंमतीबद्दल बोलायचे झाले तर , या Samsung मोबाइल फोनची किंमत $ 249.99 (सुमारे 18,700 रुपये) आहे.
 

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments