Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सॅमसंग गॅलॅक्सी A7 (2018) सह अनेक सॅमसंग फोन्स स्वस्त

Webdunia
सॅमसंग बेस्ट डेज सेल 6 डिसेंबर रोजी सुरू झाली आणि ती 31 डिसेंबरपर्यंत कायम राहील. ग्राहकांना सॅमसंग बेस्ट डेज सेल दरम्यान एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. या ऑफरचे फायदे सॅमसंग गॅलॅक्सी नोट 9, गॅलॅक्सी S9+ आणि गॅलॅक्सी A9 (2018) स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. याशिवाय गॅलॅक्सी A7 (2018) विशेष किमतीवर विकत घेण्याची संधी असेल. ईएमआय पर्यायाव्यतिरिक्त, एचडीएफसी बँक कार्डाद्वारे पैसे भरण्यावर देखील कॅशबॅक मिळत आहे. 
 
      सॅमसंग बेस्ट डेज सेल कंपनीच्या सॅमसंग इंडिया ई-स्टोअर व्यतिरिक्त, सॅमसंग स्मार्ट कॅफे आणि इतर ऑनलाईन किरकोळ स्टोअरवर देखील चालू आहे. लक्षात ठेवा, सॅमसंग गॅलॅक्सी A7 स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये 23,909 रूपयांमध्ये लॉच करण्यात आला होता. ही किंमत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी वेरिएंटची आहे. त्याच वेळी त्याची 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 28,990 रुपये होती. सॅमसंग सेलमध्ये सॅमसंग सेलमध्ये गॅलॅक्सी A7 (2018) 23,909 रुपये किमतीऐवजी 21,990 रुपयेच्या विशेष किमतीवर मिळत आहे. 
 
      गॅलॅक्सी J8 ची किंमत तर 17,990 रुपये आहे परंतु आता हा स्मार्टफोन सॅमसंग बेस्ट डेज सेलमध्ये 15,990 रुपयांच्या विशेष किमतीवर विकला जात आहे. ऍमेझॉन.इन आणि फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलॅक्सी J8 या आठवड्याच्या सुरुवातीलाच नवीन किंमतींसह सूचीबद्ध करण्यात आला. सॅमसंगचे फ्लॅगशिप स्मार्टफोन सॅमसंग गॅलॅक्सी नोट 9 आणि गॅलॅक्सी S9+ वर 9,000 रूपयांचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. सॅमसंगच्या पहिल्या फोर रीअर कॅमेरा स्मार्टफोन गॅलॅक्सी A9 (2018) वर 4,000 रूपयांचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. सॅमसंग बेस्ट डेज सेलमध्ये ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी सॅमसंग इंडिया ई-स्टोअरला भेट द्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पुढे

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

लोकल ट्रेनमध्ये सीटवरून वाद झाला, दुसऱ्या दिवशी अल्पवयीनने खून करून बदला घेतला

अजित पवार होणार पुढचे मुख्यमंत्री! निकालापूर्वीच पक्षाने बॅनर लावले

टोमॅटो आता महागणार नाही, लोकांना मिळणार दिलासा, सरकारने ही योजना केली

पुढील लेख
Show comments