rashifal-2026

करिअर शिफ्ट करताना महत्तवाच्या गोष्टी ?

Webdunia
कोणत्याही क्षेत्रातील करिअरमध्ये बराच काळ काम केल्यानंतर अनेक युवा मित्र-मैत्रिणी करिअर शिफ्ट करण्याची इच्छा बाळगतात. त्यांना जी गोष्ट आपल्याला आवडते त्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. अशा प्रकारच्या करिअर शिफ्टमध्ये केवळ एक प्रकारचा धोकाच नसतो तर हे करिअरचं असं एक वळण असतं ज्यामध्ये आपल्यावर आर्थिक रुपाचा बोजाही असतो. अशावेळी आपण आपल्या करिअरमध्ये बदल करणार असाल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं. 
 
केवळ आपल्याला बदल हवा म्हणूनच आपण करिअर शिफ्ट केलं आणि नंतर आपल्याच पायावर आपण धोंडा मारुन घेतला, असं आपल्याला वाटू नये यासाठी काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. 
 
पैसा हेच सर्व काही नाही, ही गोष्ट सर्व प्रथम लक्षात घ्या. करिअरमध्ये बदल करत असताना आपण सध्या जे काम करत आहोत त्यामध्ये कमी पैसे मिळतात आणि करिअर बदलल्यानंतर त्यामध्ये यापेक्षा जास्त पैसे मिळतील असे विचार तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात, हे लक्षात घ्या. प्रत्येक करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया असते. त्यामुळे केवळ पैशांकडेच पाहून करिअर शिफ्ट करु नका. 
 
अनेक तरुणांना दुस-यांचं अनुकरण करण्याचीही सवय असते. एकाने केलं तेच आपणही केलं तर आपलंही भलं होईल, असं त्यांना वाटत असतं. पण, प्रत्येकवेळी हा फॉम्र्युला यशस्वी होतोच, असं नाही. करिअर शिफ्ट करण्याच्या बाबतीतही तेच आहे. ब-याचदा असं दिसतं की, एखादी व्यक्ती सलग सात-आठ वर्ष एखाद्या कंपनीत काम करत असते. त्याच्याबरोबर कंपनीत काम करणा-या दुस-या एखाद्या सहका-याने आपलं करिअर शिफ्ट केलं. कारण, त्याला मिडियामध्ये काम करण्याची इच्छा होती. अशावेळी आपल्या सहका-याने करिअर शिफ्ट केलं म्हणून तसंच आपणही करु नका. आपल्याला कोणतं वातावरण सूट करतं, हे आधी ठरवा. 
 
त्याचवेळी आपल्या क्षमताही ओळखणं गरजेचं आहे. अनेकदा तरुण उत्साहाच्या भरात करिअर शिफ्ट करण्याचा विचार करतात. काहीजण त्याची अंमलबजावणीही करतात. अशावेळी ते दुस-या करिअरमध्ये काम सुरु करतात त्यावेळी त्यांना तेथील वातावरण सूट होतंच असं नाही. याचं कारण आपल्या क्षमता न ओळखता निर्णय घेतल्यामुळे असं होऊ शकतं. त्यामुळे करिअर शिफ्ट करण्याआधी त्या क्षेत्रात काम करण्याची आपली क्षमता कितपत आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. कोणत्याही पर्यायाची निवड करताना जणू काही तो आपल्यासाठी शेवटचाच पर्याय आहे, असा विचार करुन त्याची निवड करु नये. यासंबंधी आपण द्विधा मन:स्थितीत असाल तर आधी स्वत:चं आकलन करा. 
 
अनेक तरुण मित्र पाच वर्षाच्या करिअरनंतर आपल्या पसंतीच्या करिअरमध्ये जाण्यासाठी नवी डिग्री घेण्यासही तयार होतात. पण, ही गोष्ट लक्षात घ्या की, आपण पाच वर्षानंतर पुन्हा शिक्षण घेण्यासाठी जात आहात. डिग्री आपल्यासाठी फायदेशीरही ठरु शकते आणि नुकसानकारकही. कारण डिग्री मिळवण्यासाठी आपलं लक्ष दुसरीकडे केंद्रीत झालेलं असतं आणि सध्या आपण जे काम करत आहोत त्यामध्ये आपलं लक्ष नसतं. अशावेळी आपली परिस्थिती ‘ना इधर का ना उधर का’ अशी होऊ शकते. त्यामुळे करिअरमध्ये बदल करण्यासाठी मोठे निर्णय आपण घेऊ नयेत. याविषयी आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांशीही चर्चा करावी. कदाचित आपली ही समस्या ते सोडवू शकतात.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

नवीन वर्षाच्या पार्टीत असे मेकअप करा, लोक बघत राहतील

हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता या गोष्टी दूर करतील, आहारात समावेश करा

नवीन वर्षात पालकांना ही भेटवस्तू द्या, आशीर्वाद मिळेल

Turmeric vegetable पौष्टिकतेने समृद्ध रेसिपी हळदीची भाजी

हे पदार्थ पुन्हा पुन्हा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करू नये

पुढील लेख
Show comments