Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधार कार्ड मध्ये बदल केल्याने गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Webdunia
शुक्रवार, 8 डिसेंबर 2023 (19:01 IST)
अनधिकृत आधारकार्ड सेवा केंद्रात आधारकार्डात बदल करून बनावट कागदपत्र बनवून देण्याचा आरोपाखाली चौघांना अटक करण्यात आली असून बनावट कागदपत्र बनवण्याचा प्रकार पिंपरीत उघडकीस आला आहे. 
 
पिंपरी -चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने पुणे -नाशिक महामार्गावर भोसरी या ठिकाणी या प्रकाराचा पर्दाफाश केला असून चार जणांना अटक केली आहे. 
 
शिवराज प्रकाश चांभारे -कांबळे(40), स्वाती शिवराज चांभारे-कांबळे(36) या दांपत्याचे कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी असे नावाचे दुकान आहे. त्यांनी या दुकानात अधिकृत आधारकार्ड सेवा केंद्र असल्याचे भासवले आणि ग्राहकांना बनावट कागदपत्रे बनवून दिली. तसेच यांनी विविध शासकीय कागदपत्रांमध्ये देखील अनधिकृतपणे बदल केले या प्रकारात त्यांच्यासह दुकानावर काम करणारे दोघे जण शामिल होते. 

हे कागदपत्रे बनावटी असल्याचे समजल्यावर पिंपरी -चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकत पर्दाफाश केला आणि कांबळे दांपत्यासह इतर दोघांवर आधार कायद्यानुसार नागरिकांना फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत  अटक केली आहे.  

Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

दोन जणांनी घराची रेकी केली या दाव्याबद्दल संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला

बीड येथील सरपंच हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य

LIVE: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

घराला भीषण लागल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

नितीन राऊत यांनी विधानसभेत नागपूरच्या नारा नॅशनल पार्कचा सरकारने विकास करावा असा मुद्दा उपस्थित केला

पुढील लेख
Show comments