Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात सेल्फी घेताना तरुणी पडली नदीत, तरुणाने तिला वाचवण्यासाठी उडी मारली दोघांचा बुडून मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (10:31 IST)
महाराष्ट्रातील पुण्यात सेल्फीमुळे दोन मित्रांचा मृत्यू झाला. येथे नदीपात्राला भेट देण्यासाठी आलेले विद्यार्थी फोटो काढत होते. तसेच याचवेळेस सेल्फी काढत असताना एका मुलीचा पाय घसरला आणि ती नदीत पडली. मुलीला वाचवण्यासाठी एका तरुणानेही नदीत उडी मारली आणि दोघेही बुडाले. बऱ्याच प्रयत्नानंतर रोहनचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात श्रेया सुरेश गावडे वय 17 वर्षे आणि रोहन ज्ञानेश्वर ढोंबरे वय 22 यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही विद्यार्थी आपल्या इतर मित्रांसह कुंडमाळा मावळ परिसरातील इंद्रायणी नदीच्या काठावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते. सेल्फी घेताना श्रेयाचा पाय घसरला आणि ती नदीच्या पाण्यात पडली, त्यानंतर रोहनही तिला वाचवण्यासाठी पुढे आला आणि दोघेही नदीच्या पाण्यात बुडाले.
 
श्रेया आणि रोहन बुडाल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना आणि बचाव पथकाला या अपघाताची माहिती दिली. यानंतर रेस्क्यू टीमला बऱ्याच प्रयत्नांनंतर रोहनचा मृतदेह पाण्यातून सापडला, जो आता पोस्टमोर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, तर श्रेयाचा मृतदेह अजूनही रेस्क्यू टीमला सापडलेला नाही. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चतुर्थीला चंद्र दिसला नाही तर या 3 प्रकारे व्रत सोडा ! धार्मिक नियम जाणून घ्या

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वंध्यत्व आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो !

साखरेपेक्षा गुळ चांगला का आहे? त्याचे 5 सर्वोत्तम फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

सर्व पहा

नवीन

खलिस्तानी दहशतवादी पन्नूने एअर इंडियाच्या प्रवाशांना धमकीचा संदेश पाठवला

कमला हॅरिसला मत देण्यास भारतीय अमेरिकन नागरिक विचारात आहे , कारण जाणून घ्या

मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी राजकीय खेळी ! महाराष्ट्र सरकार दर्गा दर्शनाचे आयोजन करणार

Bomb Threats News: विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्यांचे प्रकरण, सरकार कठोर पावले उचलणार

पूर्व लडाख सीमा वादावर भारत आणि चीनमध्ये मोठा करार

पुढील लेख
Show comments