Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू..."; शरद पवारांना उद्देशून अभिनेत्री केतकी चितळे ची वादग्रस्त पोस्ट

Webdunia
शनिवार, 14 मे 2022 (08:20 IST)
अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही नेहमीच सोशल मीडियावरील आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. अभिनेत्री यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त विषयावर भाष्य करुन टीकेची धनी ठरली होती. आता पुन्हा एकदा 'शरद पवारांना' उद्देशून एक काव्य स्वरुपातील मजकूर शेअर करत ती वादात सापडली आहे. अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यानं एक नवा वाद निर्माण झाला आहे. (Ketaki Chitale Facebook Post in Pawar)केतकी चितळेने यावेळी अत्यंत अनादरकारक भाषेत लिखाण केलेलं आहे.
 
 
केतकी चितळेने यावेळी लिहीताना सर्व मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळत आहेत. केतकीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये "तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
 
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
 
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
 
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
 
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
 
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
 
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
 
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll" अशा शब्दातील एक कविता शेअर केलेली आहे. अॅडव्होकेट नितीन भावेंनी ही कविता लिहील्याचं म्हटलं आहे.
 
दरम्यान, या पोस्टवरती सोशल मीडियावर आलेल्या कमेंटवर नजर टाकली असता, "केतकी ताई आपली लायकी आहे का बोलायची. पवारसाहेब कुठे आपण कुठं परत गुन्हा दाखल झाला की, रडू नका..." असं म्हटलं आहे. तर काहींनी म्हटलंय की, "तिच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही. कारण नाव कुठं घेतलंय यात. कविता लिहिनाराच वकील आहे." असं यामध्ये म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

शाळेतील शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, शिक्षकाला अटक

मंदिर-मशीद मुद्द्यावर संजय राऊत यांनी दिले मोठे विधान, मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला

LIVE: शिवसेना युबीटी BMC निवडणूक एकट्याने लढवणार! संजय राऊतांनी दिले संकेत

शिवसेना युबीटी BMC निवडणूक एकट्याने लढवणार! संजय राऊतांनी दिले संकेत

महाराष्ट्रातील विभागांची विभागणी सरकारने अद्याप का केली नाही? आदित्य ठाकरे यांचा खुलासा

पुढील लेख
Show comments