Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुनीत बालनमराठी सेलेब्रिटी लीग स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव; युसुफ पठाणच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण

Webdunia
सोमवार, 1 मार्च 2021 (09:42 IST)
मराठी चित्रपटसृष्टीतील आपले लाडके कलाकार क्रिकेटच्या रणांगणात ‘पीबीसीएल’ अर्थात पुनीत बालन सेलेब्रिटी लीगच्या ट्रॉफीसाठी झुंजणार आहे. उद्योजक व चित्रपट निर्माते पुनीत बालन यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केलेल्या पीबीसीएलचा सीझन 1 लवकरच पुण्यात संपन्न होणार आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार असून या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचा म्हणजेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार खेळाडूंचा लिलाव नुकताच पार पडला.
 
भारतीय क्रिकेटपटू युसुफ पठाण यांच्या हस्ते ‘पीबीसीएल’च्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी पुनीत बालन, शोभा आर. धारिवाल, जान्हवी आर. धारिवाल, संगीतकार अजय – अतुल, विनोद सातव यांच्यासह सर्व टीमचे कॅप्टन उपस्थित होते.
 
याप्रसंगी बोलताना पुनीत बालन म्हणाले, ‘पीबीसीएल’ गेल्यावर्षी घेण्याचे आमचे ठरले होते परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ते शक्य झाले नाही. मराठी चित्रपटसृष्टी या महामारीच्या धक्क्यातून सावरत आहे, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच ‘पीबीसीएल’च्या निमित्ताने मराठी कलाकार मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. या स्पर्धेत सहा संघ असतील, टी 10 चा फॉरमॅट असेल. ‘पीबीसीएल’चा यंदा पहिला सीझन असून या स्पर्धेत दरवर्षी नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे.
 
‘पीबीसीएल’च्या लिलावात एकूण 104 खेळाडूंचा लिलाव आयकॉन्स, प्लॅटिनम आणि गोल्ड अशा तीन विभागात करण्यात आला. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडलेल्या या लिलावात कलाकार खेळाडूंना आपल्या टीममध्ये घेण्यासाठी प्रत्येक टीमच्या कॅप्टन्समध्ये मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. प्रत्येक खेळाडूची बेस प्राइज 1 लाख पॉईंट्स असलेल्या या लिलावात सर्वाधिक तब्बल 42 लाख पॉईंट्सची बोली उतुंग ठाकूर यांच्यावर लागली त्यांना तोरणा टायगर्सने आपल्या टीममध्ये घेतले, शिखर ठाकूर यांना पन्हाळा पॅंथर्सने 35 लाख पॉईंट्स, शिवनेरी लायन्सने संदीप जुवटकर यांना 31 लाख पॉईंट्स, सिद्धांत मुळे यांना प्रतापगड वॉरिअर्सने 27 लाख पॉईंट्स तर तेजस नेरूरकर यांना 25 लाख पॉईंट्स देत सिंहगड ने आपल्या टिम मध्ये घेतले. 
 
अशा असतील ‘पीबीसीएल’च्या टीम आणि त्याचे कॅप्टन्स
महेश मांजरेकर – पन्हाळा पॅंथर्स
नागराज मंजुळे – तोरणा टायगर्स
प्रविण तरडे – रायगड रॉयल्स
सिद्धार्थ जाधव – सिंहगड स्ट्रायकर्स
शरद केळकर – प्रतापगड वॉरिअर्स
सुबोध भावे – शिवनेरी लायन्स

संबंधित माहिती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

पुढील लेख
Show comments