Festival Posters

पुणे शहरात कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट, 840 नवे रूग्ण

Webdunia
सोमवार, 24 मे 2021 (09:47 IST)
पुणे शहरातील कोरोनाचा आलेख उतरू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात एक हजाराच्या खाली कोरोनाबाधित सापडत आहेत. रविवारी  शहरातील 840 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून तब्बल 63 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 949 रूग्ण  कोरोनामुक्त झाले आहेत. मृतांमध्ये पुण्यातील 40 आणि पुण्याबाहेरील 23 जणांचा समावेश आहे.
 
सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 64 हजार 916 वर पोहचला आहे. त्यामध्ये दिलासादायक बाब अशी की आतापर्यंत तब्बल 4 लाख 44 हजार 618 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यामध्ये कोरोनाचे 12 हजार 330 सक्रिय रूग्ण आहेत.
 
एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 1 हजार 309 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे पुण्यात आतापर्यंत 7 हजार 968 जणांचा बळी गेला आहे. रविवारी 11 हजार 380 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 840 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

दारू दुकान उघडणे आता सोपे राहिलेले नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नवीन एनओसी नियम जारी केले

पुण्यातील घायवळ प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

Aajibaichi Shala आजीबाईंची शाळा, नऊवारी गुलाबी साडीत दप्तर घेऊन पोहचतात आजी

कल्याण न्यायालयाने देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 8 बांगलादेशींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

LIVE: दारू दुकान उघडणे आता सोपे राहिलेले नाही उपमुख्यमंत्र्यांनी नवीन एनओसी नियम जारी केले

पुढील लेख
Show comments