Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलीला शाळेत सोडायला जाताना झालेल्या अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 19 जुलै 2022 (14:44 IST)
पुण्यातील हडपसर परिसरात सासवड मार्गाने शाळेत सोडायला चाललेल्या बाप लेकीच्या दुचाकीला हडपसर सासवड मार्गावरील ग्लायडिंग सेंटर समोर ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार बाप लेकीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात निलेश साळुंखे (35 रा.ढमाळवाड़ी,फुरसुंगी)मीनाक्षी साळुंखे(10 वर्षे) असे मृत्युमुखी झालेल्या बाप लेकीचे नाव आहे. 
 मिळालेल्या माहितीनुसार, मीनाक्षी इयत्ता पाचवीत शिकल्या होती. दररोज प्रमाणे तिला शाळेत सोडायला वडील निलेश हे दुचाकीवरून निघाले असता सात वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला हडपसरच्या ग्लायडिंग सेंटर समोर एका ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात निलेश हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मीनाक्षी हिला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी ट्रक चालक दिलीप कुमार पटेल(रा. मध्यप्रदेश) याला अटक केली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE:महाराष्ट्राची कोणतीही योजना बंद होणार नाही, मंत्री उदय सामंत

नागपुरात नवशिक्या कारचालकासह कार विहिरीत पडून तिघांचा बुडून मृत्यू

नेपाळने 23 भारतीय नागरिकांना अटक केली, केले हे आरोप

महाकुंभ: प्रचंड गर्दीमुळे प्रयागराजला जाणाऱ्या अनेक गाड्या १५ फेब्रुवारीपर्यंत रद्द

विश्वविजेता डी गुकेशचा फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम बुद्धिबळ स्पर्धेत प्रवास संपला

पुढील लेख
Show comments