Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकाने पाच वाहनांना धडक दिली,महिलेचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (14:47 IST)
पुण्यात पौडरोड परिसरात रविवारी रात्री एका मद्यधुंद चालकाने टेम्पो चालवत पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात एका 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.चालकाला भारतीय न्यायिक संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली अटक केली आहे.

आरोपी वाहन चालकाने मद्यधुंद अवस्थेत चार पाच वाहनांना धडक दिली वाहन चालकाने बेदारकारपणे  वाहन चालवले अशी माहिती पोलिसांनी दिली. आशिष पवार असे या वाहन चालकाचे नाव आहे. 

कोथरूडच्या करिष्मा सोसायटीच्या बाजूने टेम्पो चालक भरधाव वेगाने सावरकर पुलाच्या दिशेने निघाला असता त्याने चार ते पाच वाहनांना जोरात धडक दिली.

या अपघातात एका 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातानंतर वाहन चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. पोलिसांनी आरोपी आशिष पवार याला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास लावत आहे.  
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाऊडस्पीकरबाबत मोठी घोषणा केली

लाऊडस्पीकरचे नियम मोडल्यास तुरुंगवास! म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Yashwantrao Chavan Jayanti 2025 यशवंतराव चव्हाण जयंती

'१२ कोटी खर्च करून निवडणूक जिंकलो' म्हणाले आमदार प्रकाश सोळंके, अजित पवारांची डोकेदुखी वाढली

रस्ते अपघात रोखण्यासाठी दारूसोबतच ड्रग्ज टेस्टिंगही अनिवार्य-मंत्री प्रताप सरनाईक

पुढील लेख
Show comments